Chanakya Niti in Marathi - दैनंदिन व्यवहाराविषयी निरीक्षणे. (Page-12)

 दैनंदिन व्यवहाराविषयी निरीक्षणे


     जिथं मूर्ख माणसें राहतात, जिथं मोठया माणसांचा कुणी आदर करीत नाही, अशा गावी राहू नये. 

जिथे शिक्षणाची सोय नाही, औषधोपचारासाठी वैद्य नाही अशा ठिकाणी राहू नये.


    ज्ञानी माणूस हलक्या कुळातला असला तरी त्याच्यापासून ज्ञान घ्यायला हरकत नाही. हलक्या कुळात सुसंस्कृत कन्या असेल तर तिच्याशी विवाह करायला हरकत नाही. विषामध्ये अमृत मिसळले असेल तर तेही घ्यावे. घाणीत पडलेले सोनेही घ्यायला हरकत नाही.

chanakya niti book; chanakya niti book in marathi; chanakya niti book in marathi pdf free download; chanakya niti book in marathi free; chanakya niti in marathi book; chanakya niti in marathi book pdf; chanakya niti in marathi book pdf free download; chanakya niti in marathi; download chanakya niti in marathi pdf;


    आपल्या मनातील खाजगी गोष्ट कुणालाही सांगू नये. स्वत:च्याच मनात ती ठेवावी आणि योग्य वेळ येताच ती प्रकट करावी. भूतकाळात केलेल्या चूका लक्षात घेऊन आणि त्या टाळून नेहमी पुढचे काम करावे. स्पर्धेच्या या युगात गुप्तता राखणे हा एक महत्वाचा गुण आहे.


    दूरदृष्टिने विचार करणारा माणूस आपली कन्या चांगल्या कुळातल्या मुलाला देतो. तो आपल्या पुत्राला उत्तम आणि धार्मिक शिक्षण देतो. आपल्या मित्रांवरही चांगले धार्मिक संस्कार करतो. आणि आपल्या शत्रूला सतत अडचणीत गुंतवून ठेवतो. असा माणूस नेहमीच सुखी असतो.


    संसारी गृहस्थ आपल्या पुत्रांना वेदशास्त्रसंपन्न आणि धार्मिक गुरुंपासून नेहमीच दूर ठेवतात. त्यांच्या सहवासाने आपली मुले संन्यास घेतील असे त्यांना वाटते. पण अशा ज्ञानी माणसांमुळेच मुलांमध्ये सदगुणांची वृध्दि होणार आहे. त्यांनी केलेली सत्कर्म जग कधीही विसरणार नाही. त्यांचे नाव पिढ्यानपिढ्या घेतले जाईल.

Previous Page- Chanakya Niti in Marathi - धर्माविषयी. (Page-11)

Next Page - Chanakya Niti in Marathi -  दैनंदिन व्यवहाराविषयी निरीक्षणे. (Page-13)

Tags:-  chanakya niti book, chanakya niti book in marathi, chanakya niti book in marathi pdf free download, chanakya niti book in marathi free, chanakya niti ,chanakya niti quotes in marathi; chanakya niti pdf marathi; chanakya niti book in marathi; chanakya niti for success.

Comments